
देवगड : श्री.मो.गोगटे प्रशालेतील विद्यार्थिनी मधुरा प्रकाश ठुकरूल हिची इस्रोच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झालीं आहे. भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम स्पर्धा परीक्षेत देवगड तालुक्यात दुसरा क्रमांक पटकावलेली मूळ जि.प. शाळा इळये नं.१ सध्या श्री.मो.गोगटे प्रशालेत शिकत असलेली कुमारी : मधुरा प्रकाश ठुकरूल हिची इस्रोच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ही भारत सरकारची अंतराळ संस्था आहे.ज्याचे मुख्यालय बेंगळूरु शहरात आहे. “ अवकाश विज्ञान संशोधन आणि ग्रहांचा शोध घेत असतानाच राष्ट्रीय विकासासाठी अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर करणे हे त्यांचे ध्येय आहे. इस्रोचे व्यवस्थापन भारत सरकारच्या अंतराळ विभागाद्वारे केले जाते.
अभ्यास दौऱ्यासाठी जिल्ह्यातील एकूण २४ प्रज्ञावंत विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.त्यात गोगटे प्रशालेच्या मधुरा ठुकरूल हिचा समावेश आहे. विमानामार्गे येण्या-जाण्याचा, राहणे व जेवण खर्च शासनामार्फत केला जाणार आहे.
तिच्या या अभ्यास दौऱ्याच्या निवडी बद्दल विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष ॲड. अजितराव गोगटे ,सचिव- प्रवीण जोग , शाला समितीचे अध्यक्ष-प्रसाद मोंडकर,मुख्याध्यापक- श्री.सुनील जाधव यांनी अभिनंदन केले आहे.