
सावंतवाडी : संस्थानकालीन सुंदरवाडी असलेल्या सावंतवाडीत दर्जेदार असे कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हास्तरीय साहित्य संमेलन झाले. या साहित्य संमेलनाला मला यायचेच होते. पण, प्रकृतीने साथ दिली नसल्याने या संमेलनाला मला उपस्थित राहता आले नाही. जिल्हा शाखा व सावंतवाडी शाखा यांनी हे साहित्य संमेलन उत्कृष्ट असे नियोजनबद्ध केले. त्याबद्दल त्यांचे कौतुक आहे. साहित्य चळवळ अधिक व्यापकतेने पुढे जाईल अशी आशा आहे असे उद्गार कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी काढले.
सावंतवाडी येथे २२ मार्चला जिल्हास्तरीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. यानिमित्ताने पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचा सावंतवाडी शाखेतर्फे जिल्हा शाखेच्यावतीने त्यांचा स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. ते या समितीला अनुपस्थित राहिल्याने रत्नागिरी येथे एका कार्यक्रमानिमित्त आले असता पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचा सत्कार जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष नमिता कीर, कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळष सुरेश पवारष मंदार म्हस्के आदी उपस्थित होते.