SPK मध्ये YCMOU चे NEP पॅटर्नसह एम.ए. मराठी आणि एम.ए. लोकप्रशासन अभ्यासक्रम

Edited by: विनायक गावस
Published on: September 01, 2023 18:02 PM
views 75  views

सावंतवाडी : श्री पंचम खेमराज महाविद्यालयात YCMOU चे नवीन NEP पॅटर्नसह एम.ए. मराठी आणि एम.ए. लोकप्रशासन अभ्यासक्रम सामाविष्ट झाले आहेत.  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाशी (YCMOU) संलग्न असलेल्या श्री पंचम खेमराज महाविद्यालयाने एम. ए मराठी आणि एम.ए. लोकप्रशासन हे दोन मास्टर ऑफ आर्ट्स (M.A) अभ्यासक्रम नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) पॅटर्न सह सुरू झाले आहेत. M.A. मराठी, परंपरा आणि आधुनिकतेचे मिश्रण असलेले NEP च्या नाविन्यपूर्ण संकल्पनांचा समावेश करताना मराठी अभ्यासक्रमात नव्याने सादर झालेल्या M.A. मराठी ने साहित्य, भाषा आणि संस्कृतीचे सार आत्मसात केले आहे. शिक्षक, प्राध्यापक वर्गांना Ph.D तसेच नेट - सेट परीक्षासाठी उपयुक्त असा अभ्याक्रम आहे. या अभ्यासक्रमानंतर Content Writer, Professer, न्युज रिपोर्टर, अशा विविध क्षेत्रात नोकरीच्या संधी मिळतात.

M.A Public Administration भविष्यातील गव्हर्नन्स लीडर्सचे पालनपोषण करणारा NEP धोरणनुसार एम.ए. लोकप्रशासन कोर्स, स्पर्धा परीक्षार्थीना आधुनिक प्रशासन आणि सार्वजनिक सेवेच्या गुंतागुंतींमध्ये सहभागी होण्यासाठी तयार करतो.

भारतीय शासन प्राणालीचा सिद्धांत आणि व्यावहारिक दृष्टिकोन यांचे मिश्रण असलेला हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना धोरण तयार करणे, प्रशासकीय निर्णय घेणे, प्रभावी सार्वजनिक व्यवस्थापन सुलभ करण्यासाठी आवश्यक कौशल्ये सुसज्ज करतो. UPSC/MPSC तसेच इतर स्पर्धा परीक्षार्थी अभ्यासासाठी फायदेशीर असा अभ्याक्रम आहे.

श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप भारमल यांनी विद्यार्थ्यांना, 'नवीन NEP पॅटर्न नुसार सुरू झालेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी, पदवी झालेल्या तसेच पदव्युत्तर विद्यार्थ्यांना द्वितीय डिग्रीसाठी प्रवेश घेण्याचे आव्हाहन केले.'

क्रिटिकल थिंकिंग आणि एक्सपेरिअन्शिअल लर्निंगवर NEP च्या पॅटर्नचा भर विद्यार्थ्यांना सार्वजनिक क्षेत्रात अर्थपूर्ण योगदान देण्यास सक्षम करेल. प्रवेश प्रक्रिया, अभ्यासक्रम आणि इतर संबंधित तपशीलांबद्दल माहितीसाठी, इच्छुक उमेदवारांना साहेब रिसर्च सेंटरच्या वेबसाइटला भेट देऊ शकतात जे एसपीके कॉलेजमधील YCMOU विभागाचे संपूर्ण संचालन व्यवस्थापित करत आहेत.

वेबसाईट: https://www.sahebresearchcentre.com/