
वेंगुर्ला : शालेय जीवनात क्रीडा महोत्सवात महत्वपूर्ण असून विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या सहशालेय कार्यक्रमातून आपला सर्वांगिण विकास साधावा असे आवाहन शालेय क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी शालेय समिती चेअरमन एम.जी.मातोंडकर यांनी केले. अणसूर पाल हायस्कूलचा क्रीडा महोत्सव नुकताच संपन्न झाला. या महोत्सवात १०० मीटर धावणे, मॅरेथॉन, गोळाफेक, बॅडमिटन, कॅरम, बुद्धिबळ, व्हॉलीबॉल, खो-खो आदी स्पर्धा घेण्यात आल्या.
१०० मिटर धावणेमध्ये बाळकृष्ण राऊळ, प्रज्योत गावडे, यज्ञेश गावडे, प्राची गावडे, हर्षला पालकर, ऋतुजा पालकर, मॅरेथॉनमध्ये बाळकृष्ण राऊळ, प्रज्योत गावडे, तेजस राऊळ, ऋतुजा पालकर, धनश्री गावडे, हर्षदा गावडे, गोळाफेकमध्ये साहिल आडेलकर, यज्ञेश गावडे, निशाद सावंत, राजलक्ष्मी लाड, पूर्वा आमडोसकर, हर्षला पालकर, बॅडमिटंनमध्ये विशाल न्हावी, वसंत राऊळ, मुकुंद परब, माल्विका वारंग, हर्षला पालकर, साक्षी तेली, कॅरममध्ये राघोबा गावडे, औदुंबर परब, अनिकेत शिरोडकर, नेहा गावडे, तन्वी मेस्त्री, पूर्वा चव्हाण, बुद्धिबळमध्ये साहिल गावडे, यज्ञेश गावडे, औदुंबर परब, हर्षदा गावडे, माल्विका वारंग, पूर्वा आमडोसकर, व्हॉलीबॉलमध्ये विराट कोहली विजेता तर एम.एस.धोनी उपविजेता संघ, खोखो मुलांमध्ये एम.एस.धोनी विजेता व विराट कोहली उपविजेता तर मुलींमध्ये मेरी कॉम विजेता व सायना नेहवाल उपविजेता यांनी यश मिळविले.
शालेय क्रीडाध्वजाचे ध्वजारोहण मुख्याध्यापक राजेश घाटवळ यांच्या हस्ते झाले. यावेळी अक्षता पेडणेकर, विजय ठाकर, चारूता परब व शिक्षकवृंद उपस्थित होते. स्वागत व आभार क्रीडा महोत्सव प्रमुख विजय ठाकर यांनी मानले.