
खेड : खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहती मधील श्री पुष्कर केमिकल च्या एक नंबर प्लांटमध्ये आज सकाळी अकरा वाजता स्फोट झाला. येथील ऑक्साईड च्या स्टोरेज टॅंक मध्ये स्फोट झाल्याने संपूर्ण औद्योगिक वसाहत हादरली. स्फोटामध्ये एक कामगार जखमी झाला असून एमआयडीसीच्या अग्निशामक दलाने एक तासात आग आटोक्यात आणली. यावेळी खाजगी पाण्याच्या टँकरचीही घेतली मदत घेण्यात आली.
कोकणातील सर्वात मोठ्या रासायनिक कारखाने अस खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीत आज श्री पुष्कर केमिकल अँड फर्टीलायझर्स या कारखान्याच्या युनिट एक मधील इथिलिन ऑक्साईड च्या स्टोरेज टॅंक चा मॅन वॉल उडून स्फोट झाला आहे. सकाळी ११ वाजता हा अपघात घडला. या स्फोटामुळे एक कामगार किरकोळ जखमी झाल्याचे समजते.