
कुडाळ : गेल्या आठ दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यात हाहाकार माजला आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका हा डोंगर भागातील गावांना बसला आहे. यात नारुर गावाचाही समावेश असून येथील समतानगरकडे जाणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असल्याने आठ दिवसांपासून या वाडीतील लोकांचा संपर्क गावापासून तुटला आहे. त्यामुळे येथील लोकांचे मोठे हाल झाले आहेत.
डोंगर भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळत असल्याने नारुर गड नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. यामुळे नदीकाठच्या भात शेतीचे नुकसान झाले आहे. दरम्यान, याची दखल कोणीही घेतलेली नाही. ग्रामपंचायतीकडूनही दखल घेण्यात न आल्याने येथील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.