
दोडामार्ग : तांबोळी गावात सध्या लाल तोंडी माकड सुपारी बागेत मोठ्या प्रमाणात हौदोस घालत आहे. सुपारी परिपूर्ण होण्याआधी ही माकड सुपारी तोडून फेकत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होतय.
या लाल तोंड असलेल्या माकडांचा वनविभागाने तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी आता तांबोळी गावातून अभिलाश देसाई व इतर शेतकरी वर्गाने केली आहे. एकीकडे वनविभाग लाल तोंड असलेले माकड पकडण्याची मोहीम जिल्ह्यात राबवत आहे. मात्र, खरोखरचं ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ही लाल तोंड असलेली माकड शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे. त्या ठिकाणी वनविभाग उशिरा लक्ष देत असल्याची तक्रार ग्रामस्थ करत आहे.