
वैभववाडी : राज्य पुरस्कृत ग्रामीण आवास योजनेअंतर्गत लोरे नं. २ ग्रामपंचायतीला सन २०२१-२२चा ‘महा आवास अभियान पुरस्कार प्राप्त झाला. या ग्रामपंचायतीने विभागस्तरावर सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त केला. आज कोकण भवन येथे विभागीय आयुक्त विजय सुर्यवंशी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच विलास नावळे, ग्रामपंचायत अधिकारी श्री कस्तुरे आदी उपस्थित होते. या पुरस्काराने ग्रामपंचायतीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.











