डॉ. बाळासाहेब सावंत नागरी पतसंस्थेचे प्रधान कार्यालय 'माने क्रीएशन'मध्ये स्थलांतरित

३० वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरव
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: February 25, 2026 20:44 PM
views 23  views

कुडाळ : येथील अग्रगण्य डॉ. बाळासाहेब सावंत नागरी सहकारी पतसंस्थेचे प्रधान कार्यालय आता 'माने क्रीएशन' या नूतन इमारतीत स्थलांतरित करण्यात आले आहे. संस्थेच्या स्थापनेला ३० वर्षे पूर्ण होत असतानाच, हा विस्तार म्हणजे संस्थेच्या प्रगतीचा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

नूतन कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. यामध्ये प्रसाद रेगे, डॉ. बनवलीकर, डॉ. देवधर, जिल्हा बँकेचे जनरल मॅनेजर प्रमोद गावडे, आणि आर. टी. मार्गज यांचा प्रामुख्याने समावेश होता. या मान्यवरांनी संस्थेच्या कार्याचा गौरव करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

आर्थिक शिस्त आणि ठेवींकडे कल

मागील दहा वर्षात या पतसंस्थेच्या कामकाजाला मोठी गती मिळाली आहे. संस्थेचे व्यवस्थापन अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू असून, सध्या संस्थेने एक महत्त्वाचे धोरणात्मक पाऊल उचलले आहे. कर्ज वाटपाचे प्रमाण नियंत्रित ठेवून आपल्या ठेवी वाढवण्यावर संस्थेने विशेष भर दिला आहे, ज्यामुळे संस्थेची आर्थिक स्थिती अधिक भक्कम झाली आहे.

डॉ. बाळासाहेब सावंत ही पतसंस्था महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी कृषी मंत्री डॉ. परशुराम कृष्ण सावंत (बाळासाहेब सावंत) यांच्या नावाने कार्यरत आहे. ही संस्था स्थापन करण्यासाठी सुरुवातीच्या काळात अतोनात कष्ट आणि प्रयत्न करावे लागले होते. त्यांच्या आदर्श तत्त्वांवरच या संस्थेची उभारणी झाली असून, आज ती एक विश्वासार्ह आर्थिक संस्था म्हणून नावारूपास आली आहे.

"संस्थेचे कार्य अतिशय पारदर्शक असून, सभासदांचा विश्वास हेच आमचे भांडवल आहे. नूतन कार्यालयामुळे ग्राहकांना अधिक चांगल्या सेवा देणे सोपे होईल."