दोडामार्ग : सांस्कृतिक लोककला मंच दोडामार्ग च्या वतीने सांस्कृतिक लोककला महोत्सव २०२५ द्वितीय वर्ष चे शुक्रवार दि.१४ शनिवार १५ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत श्री देव खंडोबा सभागृह सरगवे, पुनर्वसन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. लोककला महोत्सवाचा उदघाट्न सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम कलाकारांचे एकजुटीचे प्रतिक म्हणून साजरा होणार आहे. लोककलेतील २८ कला पथकांचा सहभाग असणार आहे.अशी माहिती मंचा चे अध्यक्ष शंकर जाधव यांनी दिली.
राज्यातील सांस्कृतिक व पारंपारिक कलेची लोकांना माहिती व्हावी तसेच त्याचे जतन व संवर्धन करण्यासाठी सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन देण्याचे कार्य सांस्कृतिक लोककला मंच दोडामार्ग तर्फे करण्यात येते.
यासाठी राज्यात आणि खासकरून आपल्या सिंधुदुर्ग आणि दोडामार्ग तालुक्यात ज्या संस्था आणि कलाकारांनी लोककला जोपसल्या आहेत आणि जोपासत आहेत अशा विविध लोककला सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांना स्वतंत्र व्यासपीठ मिळवून देण्यासाठी अनेक संस्था पुढाकार घेऊन लोककला महोत्सव आयोजित केले जातात त्याच धर्तीवर दोडामार्ग तालुक्यातील कानाकोपऱ्यातल्यात विशेषतः ग्रामीण भागात फुगडी,समई नृत्य वासुदेव आला, समूह गीत, भजन, रनमाला, कोळी नृत्य, दशावतार, दिंडी, सनई वादन, माण वादन, बासरी वादन,भरत नाट्यम, तालगडी, मिमिक्री, धालोत्सव, ओवी, वाघखेळ, व्हायोलीन वादन, कळशी नृत्य, चपई नृत्य, कीर्तन, लावणी, परंपरागत ढोलवादन, घुमट वादन, गोपनृत्य, मूर्तिकार, पिंगळा,कळसूत्री बाहुली, लेझिम, टिपरी, तुतारी वादन, तमाशा, दशावतार, खडीगंमत इत्यादी सारख्या लोककला प्रकार महाराष्ट्राच्या सर्व लोककला टिकून राहाव्यात, या लोककलांची पुढील पिढीला माहितो व्हावी आणि महाराष्ट्रातील एकूणच सर्व पारंपारिक लोककलांचे जतन करण्यासाठी या लोककलांना उत्तेजन देण्याच्या हेतूने सांस्कृतिक लोककला मंच, दोडामार्ग या मंचाच्या माध्यमातून दिनांक २ व ३ फेब्रुवारी २०२४ ला दोडामार्ग तालुक्यात प्रथमच सांस्कृतिक लोककला महोत्सव आयोजित केला होता. या महोत्सवात तालुक्यातील २८ कला पथकातील ५०० हुन अधिक कलाकार सहभागी झाले होते.
सांस्कृतिक लोककला मंच, दोडामार्ग या मंचाच्या माध्यमातून सांस्कृतिक लोककला महोत्सव २०२५, द्वितीय वर्ष, शुक्रवार दिनांक १४ व शनिवार दिनांक १५ फेब्रुवारी २०२५ या कालावधित श्री देव खंडोबा सभागृह सरगवे पुनर्वसन, तालुका दोडामार्ग जिल्हा सिंधुदुर्ग याठीकाणी आयोजित करण्यात आला आहे.अशी माहिती मंचा चे अध्यक्ष शंकर जाधव यांनी दिली.
संगीत, नाटक, भजन, दशावतार, भजन, गायन, चित्रपट, टीव्ही सीरियल, लोककला, सामाजिक कार्य, शैक्षणिक, मूर्तिकार, शिल्पकारागीर, वैध्यकीय सेवा,अशा विविध क्षेत्रात निस्वार्थ पणे उल्लेखनीय कार्य केलेल्या दोडामार्ग तालुक्यातील व्यक्तीचा सत्कार सोहळा
🔹सत्कार मूर्ती🔹
श्री.गणेश महादेव ठाकूर [नाट्यकर्मी] रा. सासोली ता.दोडामार्ग जि. सिंधुदुर्ग, श्री. नित्यानंद तात्या पेडणेकर,[रंगकर्मी ], रा. घोटगेवाडी, ता. दोडामार्ग जि.सिंधुदुर्ग, श्री. गंगाराम जानू कोळेकर[ सामाजिक कार्य ] रा. खानयाळे,ता. दोडामार्ग जि. सिंधुदुर्ग, श्री. जनार्दन गणेश सुतार, [ निवृत्त शिक्षक तथा कलातज्ञ ], रा. घोटगे,ता.दोडामार्ग जि. सिंधुदुर्ग, श्री. आनंद (मिलिंद) गोविंद मणेरीकर [ संगीत नाटक कलाकार ], रा. घोटगेवाडी, ता. दोडामार्ग जि. सिंधुदुर्ग, श्री.संतोष पांडुरंग भिसे, [ हार्मोनियम वादक ],रा.भेडशी,ता. दोडामार्ग जि. सिंधुदुर्ग, श्री.ज्ञानेश्वर राजाराम सावंत, [ तबला वादक ], रा.सरगवे पुनर्वसन, ता. दोडामार्ग जि.सिंधुदुर्ग, श्री.कृष्णा (उली) यशवंत नाईक, [ जेष्ठ दशावतार कलाकार ], रा. दोडामार्ग सावंतवाडा, ता.दोडामार्ग जि.सिंधुदुर्ग, श्री.सुधीर हरिश्चंद्र सावंत, [ गायक कलाकार ],रा.दोडामार्ग सावंतवाडा, ता. दोडामार्ग जि. सिंधुदुर्ग, श्री. दत्ताराम उर्फ बाबा पांडुरंग टोपले, सिने अभिनेता ], रा. भेडशी, ता.दोडामार्ग जि.सिंधुदुर्ग, श्री. उदय सखाराम पास्ते, [ अभिनेता ], रा. दोडामार्ग, ता. दोडामार्ग जि.सिंधुदुर्ग, श्री.तुषार सोनू नाईक, रा. मोचेमाड, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग, श्री.गोविंद रामदास शिरोडकर [ ज्येष्ठ लेखक, पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते ], रा. दोडामार्ग कसई, ता. दोडामार्ग जि. सिंधुदुर्ग, श्री. प्रकाश (बाली) यशवंत नाईक नाईक सामाजिक कार्यकर्ते ], दोडामार्ग, रा.दोडामार्ग सावंतवाड, ता. दोडामार्ग जि.सिंधुदुर्ग, श्री. प्रसाद गंगाराम गोसावी दोडामार्ग [ संगीत ], ओमकारवाडी,रा. दोडामार्ग, ता. दोडामार्ग जि. सिंधुदुर्ग, श्री.रघुनाथ कृष्णा कांबळे, [ भजनी गायक, तबला - हार्मोनियम वादक ], रा. खानयाळे, ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग, श्री.हरिश्चंद्र लक्ष्मण भिसे, [ शिक्षण आणि वाचणालाय चळवळ ], रा. कळणे ता. दोडामार्ग जि.सिंधुदुर्ग, श्री. भिमनाथ लक्ष्मण चोर्लेकर,[ लोकाकला ], रा. विर्डी, ता. दोडामार्ग जि.सिंधुदुर्ग, श्री. पंढरीनाथ रामचंद्र देऊलकर, [ मूर्ती कारागीर ], रा. खानयाळे, ता. दोडामार्ग जि. सिंधुदुर्ग, डॉ. माधुरी शरद नाईक, [ वैध्यकीय सेवा ], झरेबांबर, ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग, श्री.संदीप अमृत देसाई [ संपादक दैनिक कोकणसाद ], रा.बाबरवाडी, तालुका दोडामार्ग जि. सिंधुदुर्ग, श्री.प्रमोद नारायण गवस [ संपादक डी एस एन न्यूज ], पूनम विष्णू पालव उर्फ प्राची प्रभाकर धुरी [ शिक्षण ] रा.साटेली भेडशी ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग, श्री.बाबूराव रामचंद्र घोगळे जि. प. प्रा.शाळा कुंब्रल नं ०२, ता. दोडामार्ग जि. सिंधुदुर्ग