
सावंतवाडी : सावंतवाडीत २८ डिसेंबरला आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलनानिमित्त संमेलन लोगो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे श्रीराम वाचन मंदिरच्या आयोजनाखाली हे संमेलन होत आहे. या स्पर्धेसाठी उत्तम कलाकृतीला २५०० रुपयांचे पारितोषिक तसेच सन्मानपत्र आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे. लोगो विषयाला साजेसा वा रंगीत असावा. लोगोचा आकार - 5 x7 इंच अथवा 6 x 8 इंच असावा. एक कलाकार एक अथवा दोन लोगो (कलाकृती ) पाठवू शकतो. लोगोवर वॉटरमार्क नसावा. लोगो जेपीईजी फॉर्मॅटमधेच व व्हाईट बॅकग्राऊंडवर पाठवावा. रिझोल्युशन ३०० डीपीआय हवे. कलाकाराने पाठवलेला लोगो ओरिजिनल आणि स्वतः काढलेला असावा. सदर लोगो ५ डिसेम्बरपर्यंत ta6608001@gmail.com येथे पाठवावा. अथवा प्रत्यक्ष कार्यालयात आणून द्यावा. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी राजेश मोंडकर ९४२३३०१७३१ यांच्याशी अथवा श्रीराम वाचन मंदिर कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन संमेलन आयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे.










