
सावंतवाडी : तुतारी एक्स्प्रेसमध्ये खायचे पदार्थ विकणाऱ्या स्थानिक महिला भगिनींना परप्रांतीय व्यावसायिकाकडून धमक्या दिल्या जात असून त्यांना रेल्वे गाड्यां मध्ये पदार्थ विकण्यास मज्जाव केला जात आहे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही. तर त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाईची मागणी करणार असल्याचा इशारा उद्भव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे पदाधिकारी राजाराम उर्फ (आबा) चीपकर यांनी दिला आहे.
कोकणातून जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या तसेच तुतारी एक्सप्रेस मध्ये काही महत्त्वाच्या रेल्वेच गाड्या मध्ये स्थानिक महिला भगिनी खायचे पदार्थ विक्री करतात त्यांना हॉकर्स संघटनेचा परवाना देखील आहे. सावंतवाडी रेल्वे स्थानकात बिर्याणी विक्री करणाऱ्या एका स्थानिक महिला भगिनीला देखील कुडाळ मधील पदार्थ विक्री करणाऱ्या परप्रांतीय व्यवसायिका कडून धमकी दिली जात आहे. तर त्यांना गाड्यांमध्ये विक्री करण्यास मनाई केली जात आहे. त्याला विचारणा केली असता इथे व्यवसाय करू नये कोणाला ते घेऊन या बघून घेऊ अशी भाषा वापरली जात आहे. त्यांना अधिकारी व कुडाळ मधील काही जणांचा पाठिंबा आहे त्यामुळे परप्रांतीय व्यावसायिकांची रेल्वे गाड्यांमध्ये मुजोरी वाढली आहे. असे प्रकार शिवसेना कोणत्याही प्रकारे खपवून घेणार घेणार नाही. जर स्थानिकाना रेल्वे गाड्या मध्ये पदार्थ विक्री करण्यास दिले नाहीत तर त्यांना सहकार्य करणाऱ्यांना योग्य धडा शिकवला जाईल. स्थानिक महिला भगिनी व व्यावसायिकांवर त्या बाहेरील परप्रांतीयांची दादागिरी होणारा अन्याय सहन केला जाणार नाही सावंतवाडी रेल्वे स्थानकावर स्थानिक लोकांना व्यवसाय करण्याचा अधिकार आहे असे श्री चीपकर यांनी म्हटले आहे.
काही मजूर परप्रांतीय ठेकेदार तुतारी गाडीत खाण्याचे पदार्थ विक्री करतात. मात्र स्थानिक महिलांना व्यवसाय करण्यास त्रास देत असून त्यांना अरेरावीची भाषा वापरत त्रास देत शिवीगाळ करत आहेत आपण इथे व्यवसाय करू नये असे सांगत आहेत हे प्रकार वेळीच थांबले पाहिजेत जर परप्रांतीय स्थानिकांवर अन्याय करत असतील तर जशास तसे उत्तर देत यांचे सर्व धंदे बाहेर काढू असा इशारा शिवसेना उबाठा गटाचे पदाधिकारी युवा पदाधिकारी राजाराम चिपकर यांनी दिला आहे. बाहेरून येऊन परप्रांतीयांनी इथे विविध कामांचे ठेके घेतले आहेत काही व्यवसाय करतात ते त्या शिस्तीत करावे त्यांना स्थानिकांच्या विरोधात कोणी सहकार्य करत असेल तर त्यानाही त्यांची जागा दाखवू असा इशारा देखील श्री चीपकर यांनी दिला आहे.