बबन साळगावकर यांचे स्थानिक व्यापाऱ्यांनी मानले आभार !

Edited by: विनायक गावस
Published on: September 22, 2023 18:18 PM
views 196  views

सावंतवाडी : माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचे स्थानिक व्यापाऱ्यांनी आभार मानले. गणेशचतुर्थीच्या कालावधीमध्ये स्थानिक व गावातून येणाऱ्या महिला व्यापाऱ्यांना दरवर्षाप्रमाणे बाजारपेठेमध्ये जागा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांना बबन साळगावकर यांनी पत्र दिले होते.

त्यांच्या विनंतीला मान देऊन मुख्याधिकाऱ्यांनी दरवर्षाप्रमाणे स्थानिक व्यापाऱ्यांना व गावागावातून येणार व्यापाऱ्यांना बाजारपेठेमध्ये जागा उपलब्ध करून दिली. त्यामुळे त्यांचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने झाल्याकारणाने व्यापाऱ्यांनी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकार यांना मन:पूर्वक धन्यवाद देऊन त्यांचे आभार मानले.