स्थानिक वस्तूंना मार्केटिंगची गरज : निलेश राणे

कुडाळ इथं हस्तकला महोत्सवाचा शुभारंभ
Edited by: भरत केसरकर
Published on: August 09, 2023 19:19 PM
views 99  views

कुडाळ : आपल्याजवळ होणाऱ्या उत्पादित वस्तू या दर्जेदार असतात पण त्याला आवश्यक असणारी मार्केटिंग आणि वितरण व्यवस्था राबवण्यात आम्ही कमी पडतो असे भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांनी कुडाळ येथे महिला मोर्चाच्या वतीने आयोजित केलेला हस्तकला महोत्सवात सांगून यापुढे मार्केटिंग आणि वितरण व्यवस्थेकडे लक्ष दिला पाहिजे असे आवाहन केले.


महिला मोर्चाच्या वतीने कुडाळ येथील गुलमोहर हॉल येथे हस्तकला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी महिला मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, माजी नगरसेविका उषा आठल्ये, कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, उद्योजक विशाल परब, युवा मोर्चाचे रुपेश कानडे, पप्या तवटे, निलेश तेंडुलकर, नगरसेविका नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, ओरोस मंडल महिला मोर्चा अध्यक्षा सुप्रिया वालावलकर, सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब आदी उपस्थित होते.


यावेळी भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांनी या महोत्सवातील वस्तूंची पाहणी केली तसेच या वस्तू कशा प्रकारे विक्री केल्या जातात याची माहिती घेतली. या कार्यक्रमांमध्ये कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे म्हणाले की आपल्या वस्तू दर्जेदार आहेत उत्पादनही केले जाते पण त्याला मार्केटिंगची व्यवस्था आणि वितरणाची व्यवस्था ज्या पद्धतीने झाली पाहिजे त्या पद्धतीने होत नाही. आपण अशा प्रकारचे महोत्सव आयोजित करून खरोखरच हस्तकलेला चालना देतो पण नुसती चालना देऊन उपयोग नाही तर या वस्तू उत्पादित करणाऱ्या उद्योजकांना बाजारपेठ मिळवून देणे गरजेचे आहे असे सांगितले.