
दोडामार्ग : आयनोडे पुनर्वसन गावचे सुपुत्र महेश मोहन सावंत यांनी एलएलबी परीक्षेत सुयश मिळवले आहे. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बीकॉम, एमकॉम मुंबईत साठे कॉलेजमध्ये झाले. पुढील शिक्षण प्रोफेशनल डिग्री इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया हे मुंबईत झाले. त्याचप्रमाणे मुंबईतील लॉ कॉलेजमधून एलएलबीचे शिक्षण घेतले. यामागे खडतर प्रयत्न व जिद्दीच्या जोरावर त्यांनी मिळवलेली यश कौतुकास्पद आहे. ते आयनोडेतील बाळा बापू सावंत यांचे नातू आहेत. त्यांच्या यशाबद्दल विविध स्तरावरून त्यांचे अभिनंदन होत आहे.
फोटो