नौसेना दिनाचं देवगड येथून थेट प्रक्षेपण | नितेश राणेंच आयोजन

Edited by:
Published on: December 04, 2023 19:04 PM
views 164  views

देवगड : मालवण येथे होत असलेल्या नौसेना दिनाच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण देवगड मध्ये करण्यात आले होते.आम.नितेश राणे यांच्या माध्यमातून स्क्रीन वरून थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. देवगड तालुक्यातील नागरीकांनी  कार्यक्रमाचा स्क्रीन वरील थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून आनंद लुटला.

भारतीय नौदलामार्फत मालवण तारकर्ली येथे नौसेना दिन साजरा होत आहे.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित आहेत.हा कार्यक्रम थेट तालुक्यातील नागरिकांना पाहता यावा म्हणून भाजपाच्या वतीने सर्वत्र स्क्रीन लावण्यात आली होती.यावर या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले.हा कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.