छोट्या कबीर हेरेकरने सांगितले प्लास्टिकचे दुष्परिणाम..!

Edited by: विनायक गावस
Published on: October 08, 2023 16:35 PM
views 58  views

सावंतवाडी : सावंतवाडी वनविभाग तर्फे वन्यजीव व पर्यावरण संरक्षण सप्ताह साजरा करण्यात‌‌‌ आला. त्यामध्ये सर्पमित्र नवीद हेरेकर यांनी सापांविषयी माहिती दिली. सापाबद्दल लोकांमध्ये असलेले गैरसमज व अंधश्रद्धा यावर मार्गदर्शन केले. तर सावंतवाडी येथील शांतिनिकेतन इंग्लिश स्कूल मधील इयत्ता दुसरीचा विद्यार्थी त्यांचा चिरंजीव कबीर हेरेकर याने प्लास्टिकने होणारे पर्यावरणाचे नुकसान व वापरलेल्या प्लास्टिकचा योग्य वापर कसा करावा यावर प्रयोग सादर करत आपले मत मांडले. अगदी कमी वयामध्ये कबीरचे पर्यावरण व निसर्गाप्रती त्याचे प्रेम पाहता सर्वांनी त्याचे कौतुक केले.