लिटल एंजल्स प्री-प्रायमरी स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

छोटयांच्या कलाविष्काराने प्रेक्षक मंत्रमुग्ध !
Edited by: विनायक गांवस
Published on: December 24, 2022 12:57 PM
views 213  views

सावंतवाडी : येथील लिटल एंजल्स प्री-प्रायमरी स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. या संमेलनात छोटया छोटया चिमुकल्यांच्या विविध कला आविष्काराने सर्व प्रेक्षकाची मने जिंकली. १९९३ मध्ये श्रीमंत शिवरामराजे भोसले यांच्या हस्ते या स्कूलचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील पहिली प्री- स्कूल होती. नर्सरी ते सिनियर केजी च्या विद्यार्थ्यांनी विविध नृत्य सादर करून कला अविष्कारानी सर्वांची मने जिंकली. नाताळ या सणाचे विद्यार्थ्यांना महत्त्व कळावे या करिता सर्व विद्यार्थ्यांना नाताळाविषयी माहिती सांगण्यात आली.

दरम्यान शाळेत सॅन्ताक्लॉझ च्या आगमन होताच सर्व विद्यार्थी आनंदी झाले. सॅन्ताक्लॉझने सर्व विद्यार्थ्यांना खाऊ तसेच खेळण्याचे साहित्य वाटप केले. नाताळ सणानिमित्त शाळेत सूंदर सजावट करण्यात आली होती. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती बर्टीला डिसुझा,  श्रीमती रुझारिया डिसूझा, श्रीमती व्हिक्टोरिया, श्रीमती जॅसिंटा फर्नांडिस, तसेच विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.