
वैभववाडी : करुळ तपासणी नाक्यावर पकडण्यात आलेल्या दारुचे मोजमाप पुर्ण झाले. त्या कंटेनरमध्ये ३६लाख ९६हजार रुपयांच्या दारूचे ११००बॉक्स सापडून आले. या प्रकरणी चालक नवीन सुरेश कुमार, वय २९, मालक व क्लीनर विरेंद्र भगत सिंग, वय ४२ दोघेही रा हरियाणा या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
करुळ तपासणी नाक्यावर गोवा बनावटीच्या दारु वाहतूक करणारा कंटेनर वैभववाडी पोलीसांनी पकडला होता. ही कारवाई मंगळवारी पहाटे करण्यात आली. पोलीस ठाण्यात कंटेनर आणून त्यांचे मोजमाप सुरू आहे.