ओसरगाव टोल नाक्यावर 3 लाख 70 हजाराची दारू जप्त

Edited by: उमेश बुचडे
Published on: September 11, 2023 19:46 PM
views 351  views

कणकवली : कणकवली तालुक्यातील ओसरगाव टोलनाक्यावर सिंधुदुर्गनगरी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्यावतीने सोमवारी दुपारी 12:30 च्या सुमारास  तब्बल 3 लाख 70 हजार रुपयाची गोवा बनावटी दारू जप्त करण्यात आली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भोसले एपीआय महिंद्रा घाग यांच्या आदेशानुसार एस आय साळुंखे हवालदार राजू जामसंडेकर, हवालदार आशिष गंगावणे, हवालदार प्रमोद काळसेकर ,आशिष जामदार यश आरमारकर, बाबू तेली, हवालदार बसत्याव डिसूजा यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे

हि कार गोव्यावरून उस्मानाबाद येथे जात होती.  3 लाख 69 हजार 600 रुपयाच्या दारूसह  8 आठ लाखाची सफारी असा एकूण 11 लाखाच्या मुद्देमालासह सोलापूर येथील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील कारवाई कणकवली पोलीस करत आहेत.