
वैभववाडी:करुळ तपासणी नाक्यावर बुधवारी रात्री विनापरवाना दारु वाहतूक करणारा ट्रक पोलीसांनी पकडला.यामध्ये १२ लाखांची दारू असून याप्रकरणी ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बुधवारी रात्री ९च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
करुळ तपासणी नाक्यावर बुधवारी रात्री पोलीस हवालदार नितीन खाडे हे ड्युटीवर होते.या दरम्यान तपासणी करीत असताना कोल्हापूरकडे जाणारा ट्रक आला.त्याची तपासणी करीत असताना ट्रकातील तेल डब्यांच्याखाली दारू सापडली.यामध्ये १२ लाखांचा माल सापडून आला.याप्रकरणी ट्रकसह दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.