लायन्स क्लब - युवा रक्तदाताच्यावतीने रक्तदान शिबीर !

Edited by: विनायक गावस
Published on: September 17, 2023 15:16 PM
views 90  views

सावंतावडी : लायन्स क्लब ऑफ सावंतवाडी - युवा रक्तदाता संघटना सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीत रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आल होत. याप्रसंगी अनेकांनी रक्तदान करत या शिबिरात सहभाग घेतला. उपजिल्हा रुग्णालयासह रक्तपेढीतील रक्त पुरवठा कमी झाल्यानं हे शिबिर आयोजित करण्यात आल होत. लायन्स क्लब ऑफ सावंतवाडी व युवा रक्तदाता संघटनेच्या सदस्यांनी यावेळी रक्तदान केलं.

याप्रसंगी माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, ला.अमेय प‌ई, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी, रवींद्र स्वार, अशोक देसाई, दिव्यानी कुमठेकर, सौ.स्वाती पई, सुनिता टक्कर, माईणकर, सोमेश टक्कर, राघवेंद्र चितारी,‌ मेहर पडते, वसंत सावंत, अर्चित पोकळे, गौतम माठेकर, साईश निर्गुण, एकनाथ सावंत, डॉ सागर जाधव, प्राजक्ता रेडकर,मानसी बागेवाडी,अनिल खाडे आदी उपस्थित होते.