भजन स्पर्धेत कणकवलीचे लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ प्रथम..!

Edited by: विनायक गावस
Published on: November 13, 2023 12:29 PM
views 151  views

सावंतवाडी : श्री साटम महाराज कला क्रिडा सेवा मंडळ, निरवडे झरबाजार आयोजित कै. विलास तानावडे व कै. दयानंद काळसेकर यांच्या स्मरणार्थ गुरुद्वादशीनिमित्त साटम महाराज मंदिरात आयोजित केलेल्या निमंत्रित भजन स्पर्धेत कणकवलीचे लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला.द्वितीय क्रमांक फोंडाघाटचे पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ,माणगावचे नवतरुण प्रासादिक भजन मंडळ तृतीय क्रमांक पटकावला. तर उत्तेजनार्थ पिंगुळीचे महापुरुष प्रासादिक भजन मंडळ,प्रथम व द्वितीय क्रमांक वैभववाडीचे दत्तकृपा प्रासादिक भजन मंडळाची निवड करण्यात आली.

स्पर्धेचा उर्वरित निकाल पुढीलप्रमाणे उकृष्ट गायक - योगेश मेस्री ( लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ, कणकवली ) उकृष्ट हार्मोनियम - हेमंत तेली ( पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ,फोंडाघाट ) उकृष्ट पखवाज - प्रथमेश राणे ( महापुरुष प्रासादिक भजन मंडळ,पिंगुळी ) उकृष्ट तबला - सिद्धेश वेंगुर्लेकर ( विश्वकर्मा प्रासादिक भजन मंडळ,मातोंड ) उकृष्ट झांज - चिन्मय लाड ( दत्तकृपा प्रासादिक भजन मंडळ, वैभववाडी ) उकृष्ट कोरस - ( लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ, कणकवली ) यांची निवड करण्यात आली.स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाना ७००१ रुपये व सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र ५००१ रुपये व सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र ३००१ रुपये व सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तर हार्मोनियम वादक,गायक,पखवाज वादक,तबला वादक,झांजवादक,कोरस प्रत्येकी १००१ रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत दहा भजन संघानी सहभाग घेतला होता.परिक्षक म्हणून रामराव नायक,विश्वास जाधव, विनायक जाधव ( मुंबई ) यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन राजा सामंत ( नेरुर ) यांनी केले.