
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील बोडदे खानयाळे या ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या लीना एडविन फर्नांडिस यांनी बाजी मारली आहे. विद्यमान लोकनियुक्त सरपंच हरिश्चंद्र नाईक हे भाजप वासी झाल्याने त्या ठिकाणी उपसरपंच पदी कोणाची निवड होणार याकडे लक्ष लागले होते. मात्र माजी सरपंच व बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पदाधिकारी विनायक शेटये यांनी आपला करिष्मा दाखवत उपसरपंच पदाच्या निवडणुकीत बाळासाहेबांच्या शिवसेनेला यश मिळवून दिल आहे. बोडदे खानयाळे ग्रामपंचायत मध्ये सरपंच हरिश्चंद्र नाईक, उपसरपंच लीना फर्नांडिस यांसह दीपिका घाडी, सुजाता गवस महादेव गवस, कशिश मयेकर, विनायक शेटये, ज्ञानेश्वर हरिजन आदी सदस्य निवडून आले आहेत. लीना फर्नांडिस यांची उपसरपंच पदी निवड झाल्यानंतर बाळासाहेबांची शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस व रामदास मिस्त्री शशिकांत गवस यांनी बोडदे खानयाळेत उपस्थिती लावून नवनियुक्त उपसरपंच यांचं अभिनंदन केल आहे.