घरावर कोसळली वीज

Edited by: विनायक गांवस
Published on: June 14, 2025 13:53 PM
views 515  views

सावंतवाडी : तालुक्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे ओटवणे येथील बुराण कुटुंबाच्या घरावर वीज कोसळून लाखो रुपयाची हानी झाली. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही.


या घटनेत सुनीता सुरेश बुराण यांच्या घरावर वीज कोसळून लाखो रुपयांची हानी झाली. रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. प्रसंगावधान राखत घराबाहेर पडल्यानं मोठी हानी टळली. या घटनेत बुराण यांचा वीज मिटर जळून खाक झाला आहे. तसेच वीज घरावर पडल्याने छप्पराचे मोठे नुकसान झाले आहे.