कणकवलीत लाईटचा ट्रान्सफॉर्मर पेटला

Edited by:
Published on: March 18, 2025 12:08 PM
views 340  views

कणकवली : शहरातील विद्युत वीज वाहिनीचा मुख्य प्रवाहाचा आर बी बेकरी नजिक असलेल्या ट्रान्सफॉर्मरने अचानकपणे स्पार्किंग होत पेट घेतला. साधारणपणे तीस सेकंद पेक्षा जास्त वेळ या विद्युत ट्रान्सफॉर्मर वर हे स्पार्किंग होत होते. त्यामुळे शहरातील विद्यूत पुरवठा खंडित झाला होता. 

रविवारी रात्री वेळी देखील कणकवली शहरातील काही ट्रान्सफॉर्मरवर अशाच प्रकारचे स्पार्किंग झाले असल्याची माहिती मिळाली. या पार्श्वभूमीवर महावितरण चे कर्मचारी तातडीने घटनास्थळी झाले होते. अति जास्त लोडमुळे स्पार्किंग होऊन अशा पद्धतीने ट्रान्सफॉर्मर जळत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.