अजित पवार मुख्यमंत्री होऊ दे अबिद नाईक याचे गणरायाकडे गाऱ्हाणे

Edited by: उमेश बुचडे
Published on: September 26, 2023 22:20 PM
views 223  views

कणकवली: सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद यांनी दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुधा दि.26 सप्टेंबर रोजी कणकवली तालुका रिक्षा संघटनेच्या गणपतीची दर्शन घेऊन मंत्री अजित पवार मुख्यमंत्री होऊ दे असे गणराया चरणी गाऱ्हाणे घेतले.

तसेच गुलाब पुष्पहार अर्पण करुण पूजा देखील केली. यावेळी कणकवली तालुका रिक्षा संघटनेच्या वतीने राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांचे रिक्षा संघटनेचे अध्यक्ष बाळा वराडकर, सेक्रेटरी भाई परब, रिक्षा संघटनेचे कार्यतत्पर संचालक संतोष सावंत, बाळू वालावलकर , कणकवली राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष अमित केतकर, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, राष्ट्रवादी शहर चिटनीस गणेश चौगुले आदि उपस्थित होतेप