भर वस्तीत बिबट्या | कुत्र्याला केलं लक्ष

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: December 05, 2023 19:13 PM
views 270  views

कुडाळ : पणदूर यथील विजय चोरगे यांच्या घराच्या पाठीमागे बांधून ठेवलेल्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करत आपले भक्ष बनविले आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली असून 4 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 4:20 च्या दरम्यान बिबट्याने हल्ला करत घराच्या पाठीमागे साखळदंडाने बांधण्यात आलेल्या कुत्र्याला आपले भक्ष बनवले आहे.

याबाबत विजय चोरगे यांनी वनविभागास माहिती दिली असता वनविभाग कसाल परिमंडळ परिक्षेत्र वनपाल अनिल चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली असता नागरिकांनी वनविभागाच्या कामाबाबत  नाराजी व्यक्त केली असून डोंगराच्या पायथ्याशी दहा फुटी जाळी उभारावी अशी मागणी केली.

तर यावेळी कसालपरिक्षेत्र वनपाल अनिल चव्हाण यांनी ग्रामस्थांच्या मागणीबाबत आपण वनविभागाशी पुत्र विहार करू असे सांगितले. तर वनविभागाने याबाबत कोणतीही खबरदारी न घेतल्यास पणदुर ग्रामस्थ आंदोलन छेडतील असा इशारा पणदूर बाजारपेठ अध्यक्ष राजेश टंगसाळी यांनी दिला आहे.