संगमेश्वर : तालुक्यातील कसबा देवपाटवाडीत काल पहाटे बिबट्याने लहान वासरांची शिकार केली. गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याच्या पंचक्रोशीतील वावराने वस्त्यांमध्ये दहशत पसरली आहे. गाई गुरे आदी गोधनाच्या नूकसानामुळे शेतकरी चिंतेत आहे. बिबट्याकडुन मनुष्यहानी होण्याआधी वन विभागाने वेळीच बंदोबस्त करून लोकांना भयमुक्त करावे अशी मागणी होत आहे.
नावडी - संगमेश्वर परिसरात भरवस्तीत बिबट्या फिरत असल्याच्या तक्रारींमुळे, रत्नागिरी परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार, संगमेश्वर वनपाल तौफिक मुल्ला, वनरक्षक आकाश कडूकर, सहयोग कराडे, अरुण माळी, गणपती जळणे, रणजित पाटील, प्रभू साबणे आणि स्थानिक ग्रामस्थांसह गेले काही दिवस या परिसरात रात्रीची गस्त घालत आहेत.