बिबट्याची फासकीतून सुटका करून जेरबंद

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: November 18, 2025 19:37 PM
views 32  views

कुडाळ : स्थानिक ग्रामस्थ सुभाष तळवडेकर यांनी परिमंडळ मालवण, नियतक्षेत्र धामापुर मधील राठीवडे (भाकरदेव) नजीक मालकी जंगल भागात वन्यप्राणी बिबट फ़ासकीमध्ये अडकल्याची माहिती दिली. वनविभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी या घटनेची पाहणी केली. वनविभागचे अधिकारी, जलद बचाव पथक व ग्रामस्थ यांनी सुरक्षित रित्या सदर फासकीत अडकलेल्या बिबट ची फासकीतून सुटका करून त्याला पिंजऱ्यात जेरबंद केले. पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून सदर बिबट ची तपासणी करून सदर बिबट सुस्थितीत असल्याने त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले आहे. 

वन्यप्राणी बिबट हा अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक असून त्याचे संरक्षण करणे सर्वांचे कर्तव्य आहे. वन्यप्राणी बिबट हा भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 नुसार संरक्षित असून सदर प्राण्याची शिकार करणे, शिकारीचा प्रयत्न करणे हे गंभीर गुन्हे असून गुन्हेगारास द्रव्यदंड व कारावासाची शिक्षा होऊ शकते. सदर घटनेच्या अनुषंगाने आरोपीबाबत माहिती देणाऱ्यास रोख रक्कम स्वरूपाचे बक्षीस देऊन त्याचे नाव गुप्त राखले जाईल असे वनविभागाकडून सांगणेत आले आहे .

हे बचाव कार्य मा. मिलीश दत्त शर्मा, उपवनसंरक्षक सावंतवाडी, डॉ.सुनील लाड सहा.वनसंरक्षक सावंतवाडी यांच्या मार्गदर्शनाख़ाली वनक्षेत्रपाल कुडाळ संदीप कुंभार, वनपाल मालवण सदानंद परब, वनपाल नेरूर त ह सुर्यकांत सावंत,वनरक्षक धामापूर अतुल खोत, वनरक्षक कांदळगाव लक्ष्मण आमले, वनरक्षक नेरूर सचिन पाटील वाहन चालक राहुल मयेकर, RRT टीम सदस्य अनिल गावडे, दिवाकर बांबरर्डेकर,सुशांत करंगुटकर, वैभव अमरुस्कर, प्रसाद गावडे कुडाळ व राठिवडे पंचक्रोशी ग्रामस्थ यांच्या सहभागातुन यशस्वीरित्यापूर्ण करण्यात आले आहे.