सावंतवाडीत 'बिबट्या' की 'वाघ' ? ; फोटो व्हायरल

Edited by:
Published on: January 24, 2025 12:46 PM
views 728  views

सावंतवाडी : माठेवाडा झिरंग येथील परिसरात पुन्हा एकदा वन्य प्राण्याच दर्शन घडलं आहे. काल रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. कुत्र्यांच्या ओरडण्याचा आवाज आल्याने येथील रहिवाशांकडून पाहिलं असता हा प्रकार समोर आला. याबाबत येथील रहिवाशांकडून पुष्टी देण्यात आली आहे. सध्या सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल होत असुन फोटोमुळे हा बिबट्या आहे की वाघ ? याबाबत शंका निर्माण झाली आहे.

सद्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत असुन तो माठेवाडा येथील असल्याचे सांगितले जात आहे. या फोटोत अंगावर पट्टे दिसत असल्याने नरेंद्र डोंगर पायथ्याशी माठेवाडा भागात वाघ होता की बिबट्या ? याबाबत शंका उपस्थित झाली आहे. बिबट्याचा वावर या परिसरात आहे. यापूर्वीही तो सिद्ध झाला होता. कालच्या प्रकाराबाबत वन विभागाला कल्पना दिल्याचे स्थानिकांचे म्हणणं आहे. या घटनेबाबत वन विभाग अधिकाऱ्यांना विचारलं असता ते या घटनेबाबत अनभिज्ञ होते. या परिसरात आपली टीम कार्यरत आहे. बिबट्याचा वावर परिसरात आहे. त्यामुळे बिबट्या असण्याची शक्यता वन अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. पट्टेरी वाघाबाबत त्यांनी माहिती घेऊन सांगतो असे सांगितले. तसेच या परिसरात वन विभागाची टीम दाखल होणार असून कार्यवाही करणार असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. दरम्यान, स्थानिकांकडून उप वनसंरक्षक यांच लक्ष वेधत मनुष्यहानी होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत येथील रहिवाशांकडून निवेदन देखील श्री. रेड्डी यांना देण्यात आली आहेत.