बिबट्याची दहशत वाढली

Edited by: संदेश नाईक
Published on: February 16, 2023 16:46 PM
views 171  views

सावंतवाडी : तळवणे रवळनाथवाडी माऊली टेंबवाडी भाटले वाडीबर्डेवरवाडी येथे भर वस्तीत संध्याकाळी व रात्रीच्या वेळी बिबट्या ची दहशत वाढली आहेे. पाळीव कुत्रा पडवीत झोपलेला असताना बिबट्या पडवीत जाऊन पाळीव कुत्राचा पडदाफास केला आहे.    महीनाभर संध्याकाळी व रात्रीच्या वेळी बिबट्याचे दर्शन होत आहे. त्यामुळे संध्याकाळी सहा वाजण्याच्या नंतर रहीवाशांना बाहेर पडणे मुश्कील बनले आहे . बिबट्या आपली भुक भागवण्यासाठी तेथील रहीवाशाचे पाळीव कुत्रे खात आहे. त्या मुळे लवकरात लवकर  बिबट्याचा वनखात्यान लक्ष घालून बिबट्याचा योग्य तो बंदोबस्त करावा अशी नागरीकांच्या वतीने तळवणेचे सरपंच गोवींद (समीर) केरकर व उपसरपंच रामचंद्र गावडे व पंचसदस्य सिद्धेश कांबळी व सावळाराम घाटये व रेश्मा टाक्कर यांनी मागणी केली आहे.