मोरगावमध्ये शेत विहिरीत बिबट्या मृतावस्थेत

Edited by:
Published on: December 20, 2024 19:51 PM
views 382  views

दोडामार्ग : मोरगाव बागवाडी येथील अर्जुन अभिमन्यू मोरजकर यांच्या शेत विहिरीत बिबट्या मृतावस्थेत असल्याचे आढळून आले. लागलीच ही खबर वनविभागाला कळताच वन कर्मचारी घटनास्थळी उपस्थित राहून अथक प्रयत्नाने बिबट्याचे शव विहिरीतून बाहेर काढले. पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विच्छेदन केले असता पाण्यात गुदमरून बिबट्याचा मृत्यू झाल्याचे प्रथम निदर्शने सांगितले. याबाबत वनविभागाकडून मिळालेली माहिती अशी की, मोरगाव बागावाडी येथे अर्जुन अभिमन्यू मोरजकर यांच्या शेत विहिरीत बिबट्या मृतावस्थेत असल्याची माहिती मिळाली. माहिती नुसार लागलीच 

 उपनसंरक्षक सावंतवाडी नवकिशोर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक सावंतवाडी वैभव बोराटे, सहायक वनसंरक्षक नेहा वांद्रे, वनक्षेत्रपाल वैशाली मंडल, वनपाल किशोर जंगले, संग्राम जितकर,  सुबोध नाईक, उमेश राणे, विश्राम कुबल, प्रकाश गवस, बाळकृष्ण सावंत, संतोष शेटकर या टीमने घटनास्थळी जात कार्यवाही केली. मृत बिबट्याला जाळी व दोरखंडाच्या सहाय्याने विहिरीतून अथक प्रयत्नाने बाहेर काढले. यावेळी ग्रामस्थांचे देखील सहकार्य लाभले. बिबट्याचे शव दोडामार्ग वन कार्यालयाच्या आवारात आणून त्याचे शव विच्छेदन करण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर अस्वले, डॉक्टर कराळे, डॉक्टर ढवळे, डॉक्टर सावंत उपस्थित होते. प्रथमदर्शी पाण्यात गुदमरून बिबट्याचा मृत्यू झाला असल्याचे निदानात निष्पन्न झाले. वन अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत बिबट्याचे शव विच्छेदन करण्यात आले.