चराठेत बिबट्याचा वासरावर हल्ला

Edited by: विनायक गांवस
Published on: May 26, 2024 10:23 AM
views 602  views

सावंतवाडी : चराठे येथे बिबट्याने गाईच्या वासरावर हल्ला केला. चराठे,गावठणवाडी  ता.सावंतवाडी येथे इद्रकांत रामचंद्र मसुरकर याच्या गाईच्या वासरावर बिबट्याने हा हल्ला केला. बिबट्याच्या या हल्ल्याने वासराचा प्राण गेला असून या घटनेमुळे परीसरात घबराट पसरली आहे. बिबट्याच्या या हल्यात वासरू मेल्यानइद्रकांत रामचंद्र मसुरकर यांचे मोठं नुकसान झालं आहे