शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांचे आज मालवणात व्याख्यान

हरी खोबरेकर ; शिवप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन
Edited by:
Published on: October 06, 2024 06:03 AM
views 207  views

मालवण : राजकोट किल्ला येथील शिवपुतळा कोसळल्या प्रकरणी दोषींवर कारवाई होण्यासाठी शिवसन्मान यात्रेचे आयोजन करण्याचे आले आहेत. याच पार्श्वभूमीवर दिशादर्शक मार्गदर्शन करून पुढील दिशा ठरविण्यासाठी शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील हे आज सायंकाळी ५ वाजता बंदरजेटी याठिकाणी जाहीर सभेसाठी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी शिवप्रेमींनी उपस्थित राहवे असे आवाहन उबाठा शिवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केले आहे. शिवव्याख्याते पाटील यांचे शिवसेनेच्या वतीने कुंभारमाठ याठिकाणी भव्य स्वागत करण्यात येणार आहे. त्याठिकाणी शिवपुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर दुचाकी रॅलीने बंदरजेटी याठिकाणी त्यांचे आगमन होणार आहे. त्यानंतर शिवप्रेमींसमोर ते आपले विचार मांडणार आहेत. तरी जिल्हा भरातील शिवप्रेमींनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहनही श्री. खोबरेकर यांनी केले आहे.