
दोडामार्ग : दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज दोडामार्ग मध्ये दुर्ग मावळा प्रतिष्ठान चे सदस्य व इतिहास अभ्यासक ज्ञानेश्वर राणे यांच्या ऐतिहासिक साधने व प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमामध्ये राणे यांनी विद्यार्थ्यांना धोप तरवार, वक्र धोप, कट्यार, वाघनखे, दुदांडी, शिवराई, होन यांच्याविषयी प्रत्यक्ष साहित्य दाखवून विद्यार्थ्यांना त्या संबंधी माहिती दिली. महाराजांच्या अरमाराविषयी माहीती, दुर्गाची थोडक्यात माहिती, गड संवर्धन काळची गरज, अकबरने काढलेले टोकन, मोडी लिपी पत्रे नमुने, वीरगळ, शिलालेख याविषयी माहिती इयत्ता पाचवी ते आठवीच्या पाठ्यक्रमाशी सांगड घालून सांगितली.
व्याख्यान संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी सर्व साहित्य हाताळून प्रत्यक्ष अनुभूती घेतली. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. पी. एम. सावंत, शिक्षक राऊळ सर , जगदीश सावंत, परसु पवार, श्रीमती कोरगावकर मॅडम, श्रीमती श्रेयाली गवस उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री आनंदा बामणीकर यांनी मानले.