स्वच्छतेत आघाडी, सुंदर सावंतवाडी !

Edited by: विनायक गावस
Published on: October 01, 2023 17:24 PM
views 86  views

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषद मार्फत स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता हि सेवा हा उपक्रम दिनांक १ ऑक्टोबर २०२३ रोजी घेण्यात आला. ह्या उपक्रमा अंतर्गत सकाळी 10 वाजता "एक तारीख एक तास" स्वच्छता मोहीम घेण्यात आली.

सावंतवाडी नगरपरिषदेच्या आठ प्रभागामध्ये विविध ठिकाणी हि स्वच्छता मोहीम घेण्यात आली. या स्वच्छता मोहिमेमध्ये सावंतवाडी शहरातील विविध संस्था, सामाजिक संघटना, सार्वजनिक मंडळे, महिला बचत गट, शाळा महाविद्यालये, तसेच सावंतवाडी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक, नगरसेविका तसेच सावंतवाडी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी सावंतवाडी नगरपरिषद प्रशासक प्रशांत पानवेकर व सावंतवाडी नगरपरिषद मुख्यअधिकारी सागर साळुंखे यांनी मार्गदर्शन केले. तसेच स्वच्छता मोहिमेत सहभाग दर्शविला. यावेळी सावंतवाडी नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी व सफाई मित्र उपस्थित होते.