
सावंतवाडी : भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेेली यांचा सुपुत्र प्रथमेश यांच्या लग्न स्वागत सभारंभाच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या बड्या नेत्यांसह विरोधी पक्षातील माजी मंत्री आणि पदाधिकारी उद्या सावंतवाडीत जिमखाना मैदानावर उपस्थित राहणार आहेत. या मैदानावर समारंभासाठी भव्य दिव्य असा सेटअप उभा करण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणेंसह मंत्री गिरीश महाजन, भाजप नेते विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, उद्योगमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, माजी राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, खासदार धनंजय महाडिक, भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे आदी नेतेमंडळी सावंतवाडीत उपस्थित राहणार आहेत.
जिमखाना मैदानावर हा सोहळा होत असून यासाठी भव्य दिव्य स्वरूपात सेटअप उभारण्यात आला आहे. उद्या होणार्या या कार्यक्रमात वधुवरांना आर्शीवाद देण्यासाठी भाजप आणि विरोधी पक्षातील नेत्यांसह मित्रमंडळी उपस्थित राहणार आहेत. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यासह केंद्रीय मंत्री नारायण राणे, राष्ट्रीय नेते विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, उद्योगमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, माजी मंत्री राम शिंदे, जयकुमार रावल, माजी आमदार राजा राऊत, आमदार शहाजी बापू पाटील, खा. सुनिल तटकरे, आ. बंटी पाटील, आ.शेखर निकम, खासदार संजय पाटील, धनंजय महाडिक, आ.प्रविण दरेकर, गोव्याचे आमदार प्रवीण आर्लेकर, आ. जीत आरोलकर, आ. डॉ. चंद्रकांत शेटये आदी अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.