गोवा बनावटीची दारू बाळगल्याबाबत एलसीबीची कारवाई

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: September 02, 2025 20:55 PM
views 30  views

कणकवली गोवा बनावटीची दारू गैरकायदा, बिगरपरवाना ताब्यात बााळगलेल्या स्थितीत आढळल्याप्रकरणी किशोर अंकुश निग्रे (३९, खारेपाटण - कोष्टीआळी) याच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी नडगिवे - देऊळवाडी येथील आंबा, काजू बागेत मंगळवारी दुपारी १.२५ वा. सुमारास केली. यात ७० हजार ३५० रुपयांची दारू व ८ लाखांची बलेनो कार मिळून ८ लाख ७० हजार ३५० रुपयांचा मु‌द्देमाल जप्त करण्यात आला. कारवाईत एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र शेळके, हवालदार आशिष गंगावणे, किरण देसाई आदी सहभागी झाले होते.