कुडाळ शहरात तब्बल २ किलो गांजा जप्त

स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची धडक कारवाई
Edited by: विनायक गांवस
Published on: May 01, 2023 18:55 PM
views 562  views

सिंधुदुर्ग : कुडाळ शहरात अनंत मुक्ताई हॉटेल समोर सार्वजनिक सुलभ शौचालया ठिकाणी एक इसम दुचाकीवरून येऊन गांजा विक्री करणार आहे अशी गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकास मिळाली होती. त्यावरून सापळा रचून एका आरोपी विरुद्ध कारवाई करण्यात आली. त्या इसमाच्या दुचाकीच्या सीट खालील डिकीत एकूण 02 किलो 103 ग्रॅम गांजा मिळून आला. 63 हजार 090 रूपयांचा गांजा आणि 40 हजार किमतीची हिरो ड्युएट दुचाकी व 8 हजार किमतीचा मोबाईल हँडसेट असा एकूण 1 लाख 11 हजार 090 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

        आरोपी विरूद्ध कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कुडाळ पोलीस अधिक तपास करत आहेत. हि धडक कारवाई पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, पोलीस उप निरीक्षक रामचंद्र शेळके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुरुनाथ कोयंडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अनुप कुमार खंडे, कृष्णा केसरकर, प्रकाश कदम, प्रमोद काळसेकर, प्रथमेश गावडे, अमित तेली, अनिल धुरी यांनी केली आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची फिर्याद प्रमोद काळसेकर यांनी दिलीय.