वेंगुर्ल्यात अवैध दारू विक्रीवर एलसीबीची कारवाई | ४३ हजारांचा मुद्देमाल जप्त

Edited by:
Published on: September 12, 2023 18:16 PM
views 274  views

वेंगुर्ला : वेंगुर्ला शहरातील भटवाडी पेट्रोलपंप समोरील जुस्तीन पीटर अराऊज यांच्यावर अवैध गोवा बनावटीची दारू विक्री करताना ओरोस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई केली आहे. त्यांच्या ताब्यातील सुमारे ४३ हजार २०० रुपयांची गोवा बनावटी दारू जप्त करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई आज सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पीएसआय शेळके, हवालदार जामसंडेकर, खंडे, गंगावणे, जयेश सरमळकर यांनी ही कारवाई केली आहे.