
सावंतवाडी : सावंतवाडी येथील हेल्थ पार्क चालविण्यासाठी निवृत्त इन्कम टॅक्स कमिशनर विवेक बात्रा यांच्या माध्यमातून सक्षम असा व्यक्ती मिळाला आहे. इथे पर्यटकांना सुख सुविधा मिळणार आहेतच. पण, त्यासह मास्टर ट्रेनर्स तयार होणार आहेत. सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून ते पुढील काळात उदयाला येईल असं मत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. याठिकाणी पंचकर्म चिकित्सा होणार आहे. तसेच किडनी फेल झाल्यात अशांनाही नवजीवन मिळणार आहे असं प्रतिपादन मंत्री केसरकर यांनी केल. तर हेल्थ पार्क येथे वेलनेस सेंटर लवकरच सुरू होणार असल्याचं त्यांनी सांगितले. स्वातंत्र्य दिनी 'वाह सावंतवाडी' या वेबसाईटच लॉन्चिंग करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.
दीपक केसरकर म्हणाले, वाह काश्मीर नावाची साईट सुरू करत विवेक बात्रा यांनी काश्मीर येथे पर्यटन प्रकल्प सुरू केलेत. पर्यावरण पुरक असे प्रकल्प ते चालवत आहेत. सावंतवाडी येथील हेल्थ पार्क चालविण्यासाठी सक्षम अशी व्यक्ती अथवा संस्था सापडत नव्हती. बात्रा यांच्या माध्यमातून ती उणीव दूर झाली. मुख्याधिकारी यांनीही यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे हेल्थ पार्क येथे पर्यटकांना सुख सुविधा मिळणार आहेच. पण, त्यासह मास्टर ट्रेनर्स तयार होणार आहेत. सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून ते पुढील काळात उदयाला येईल. या सेंटरच्या नुतनीकरणासाठी लागणारा खर्च संबंधित कंपनी करत आहे. उत्तम असा हेल्थ स्पा देण्यासाठी तज्ञ मंडळी याठिकाणी उपलब्ध असणार आहेत. पंचकर्मच्या माध्यमातून प्राचीन आयुर्वेदीक ज्ञान जगापर्यंत पोहचू शकणार आहे. डॉ. एस एम राजू यांनी यात संशोधन केलं आहे. ज्यांच्या किडनी फेल झाल्यात अशांनाही ते नवजीवन देऊ शकतात. 'वाह सावंतवाडी' या वेबसाईटच लॉन्चिंग करण्यात आलं आहे. यात सावंतवाडीसह सिंधुदुर्गची संपूर्ण माहिती असणार आहे. गणेश चतुर्थीपूर्वी त्यांचा हा प्रकल्प सुरू व्हावा, त्याच्या शुभारंभासाठी मी आवर्जून उपस्थित राहीन असं ते म्हणाले. मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करत या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी निवृत्त इन्कम टॅक्स कमिशनर विवेक बात्रा, सेवानिवृत्त आयऎएस अधिकारी एस एम राजू, वेंगुर्लेचे माजी नगराध्यक्ष सुनिल डुबळे, सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, मुख्याधिकारी सागर साळुंखे, जर्मनी येथील उद्योजक ओंकार कलवडे, केदार जाधव, आयुर्वेदिक डॉ. मिनल बिरंबोळे, नंदू शिरोडकर, शिवप्रसाद कुडपकर, गजानन परब आदी उपस्थित होते.
सावंतवाडीसाठी काहितरी करण्याची संधी दिलीत त्यासाठी आम्ही ऋणी आहोत. टॉप क्लास असं हेल्थ सेंटर आम्ही बनवत आहोत. ज्यामध्ये स्थानिकांसह पर्यटकांसाठी मार्गदर्शक अशी वेलनेस सेवा उपलब्ध असणार आहे. दीपक केसरकर यांनी आम्हाला संधी दिली आहे. स्थानिकांच्या मदतीने व सहकार्याने आम्ही या संधीच सोन करू. या हेल्थ सेंटरला आम्ही नवसंजीवनी देत आहोत.गणपतीपूर्वी येथे सेवा देण्याचा आमचा मानस आहे अस मत विवेक बात्रा यांना व्यक्त केले. डॉ. एस एम राजू म्हणाले, वर्ल्ड क्लास असं वेलनेस हेल्थ सेंटर सावंतवाडी येत आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या सहकार्यानं हे शक्य झालं आहे. या ठिकाणी किडनी, स्टोन, लिव्हर सिरोसिस सारख्या आजारांवर आयुर्वेदाच्या माध्यमातून उपचार होणार आहेत.