पत्रकार संघातर्फे आरपीडी कॉलेजमध्ये जलसंवर्धन सप्ताह जनजागृती उपक्रमाचा शुभारंभ

Edited by: विनायक गावस
Published on: July 06, 2023 21:12 PM
views 67  views

सावंतवाडी : सावंतवाडी तालुका पत्रकार संघ,सावंतवाडी वनविभाग आणि आर पी डी काँलेज यांच्या संयुक्त विद्यमाने "जल संवर्धन" सप्ताहानिमित्त जनजागृती उपक्रमाचा शुभारंभ शुक्रवारी 7 जुलै रोजी सायंकाळी 3.30 वाजता काँलेज सभागृह आणि परिसरात आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमांमध्ये जलसंवर्धनाबाबत निवृत्त प्राचार्य श्री गिरीधर परांजपे हे मार्गदर्शन करणार आहेत. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकासभाई सावंत, प्रमुख पाहुणे उपवनसंरक्षक नवल किशोर रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक डॉ सुनील लाड, सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षिरसागर, प्रशाळेचे मुख्याध्यापक जगदीश धोंड यांची उपस्थिती असणार आहे.

तरी या कार्यक्रमात पर्यावरण आणि निसर्गप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार आणि सचिव मयूर चराटकर यांनी केले आहे.