कुडाळात देवेंद्र प्रबोधमालेचा शुभारंभ

पहिले पुष्प कीर्तनकार ह. भ. प. प्रशांत धोंड यांनी केले सादर
Edited by: भरत केसरकर
Published on: August 23, 2023 12:03 PM
views 88  views

कुडाळ : कुडाळ भारतीय जनता पक्षाच्यावतीने कुडाळ भाजप कार्यालय येथे देवेंद्र प्रबोधमालेचा शुभारंभ करण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वर्षभर हा प्रबोधमालेचा कार्यक्रम सुरू राहणार आहे. या पहिल्या पुष्पाचा शुभारंभ भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त या प्रबोधमालेचा आयोजन करण्यात आले आहे. या प्रबोधमालेचे पहिले पुष्प कुडाळ येथे झाले.  यावेळी सेवानिवृत्त शिक्षक चंद्रकांत साईल, जिल्हा चिटणीस विनायक राणे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, ओबीसी महिला जिल्हाध्यक्ष दीपलक्ष्मी पडते, कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, पोरस मंडल अध्यक्ष दादा साईल, प्रदेश सदस्य बंड्या सावंत, महिला जिल्हा चिटणीस रेखा काणेकर, सौ तेजस्विनी वैद्य, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर, भाई बेळणेकर, राजा धुरी, निलेश तेंडुलकर, रुपेश कानडे, राजन पांचाळ, निलेश परब, श्रावण शिरसाट, सुनील बांदेकर आदी उपस्थित होते.