सावंतवाडी मतदारसंघातील वेंगुर्ल्यात भाजपाच्या " घर घर संपर्क " अभियानाचा शुभारंभ

Edited by: दिपेश परब
Published on: June 24, 2023 20:10 PM
views 125  views

वेंगुर्ला :  " मोदी @ ९ " कार्यक्रमा अंतर्गत वेंगुर्ले तालुक्यामध्ये भाजपा च्या वतीने " घर घर संपर्क " अभियानाचा शुभारंभ जिल्हाध्यक्ष राजन तेली व प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

   पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत योजना पोहचवुन गरीब जनतेला विकासाच्या दिशेने घेऊन जाण्याचे कार्य केले . मागील ९ वर्षात देश आर्थिक , संरक्षण , आरोग्य , रोजगार , तंत्रज्ञान या क्षेत्रात आघाडीवर आहे . त्यामुळे मागील ९ वर्षातील पंतप्रधान मोदींच्या कामांचा प्रचार प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचावा यासाठी हे " घर घर अभियान " असल्याचे सांगितले . या अभियानाच्या माध्यमातून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ६०००० लोकांपर्यंत मोदींचे कार्य पोहचवुन ९०९०९०२०२४ या क्रमांकावर मिसकाॅल देऊन मोदींना समर्थन द्यावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी कार्यकर्त्यांना केले .

   यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , नगराध्यक्ष राजन गिरप , महिला अध्यक्षा स्मिता दामले , जिल्हा उपाध्यक्ष अॅड.सुषमा खानोलकर , जिल्हा कार्यकारिणी सदस्य साईप्रसाद नाईक व वसंत तांडेल व बाळा सावंत , ता.सरचिटनिस प्रशांत खानोलकर व बाबली वायंगणकर , ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडीस व प्रीतेश राऊळ व संतोष गावडे  , खरेदी विक्री संघाचे चेअरमन ज्ञानेश्वर केळजी ,   ता.चिटनीस जयंत मोंडकर व सुजाता देसाई , किसान मोर्चा चे बाळु प्रभु , अनु.जाती मोर्चा चे गुरुप्रसाद चव्हाण , महीला शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर , शक्ती केंद्र प्रमुख गणेश गावडे - विजय बागकर - गोविंद मांजरेकर - सुधीर गावडे - संतोष शेटकर - कमलेश गावडे - आनंद गावडे , नगरसेवक प्रशांत आपटे व श्रेया मयेकर , अणसुर सरपंच सत्यविजय गावडे , परबवाडा उपसरपंच विष्णू उर्फ पपु परब , दादा केळुसकर , ओबीसी सेलचे शरद मेस्त्री , युवा मोर्चाचे नारायण कुंभार - भुषण सारंग - प्रीतम उर्फ पिंटु सावंत , महीला मोर्चाच्या रसिका मठकर - सुजाता पडवळ - आकांक्षा परब , बुथ प्रमुख रविंद्र शिरसाठ - निलेश गवस - पुंडलिक हळदणकर - नितीश कुडतरकर , संदिप देसाई , राजन पडवळ , गणपत गावडे , सुनील मठकर , अमित गावडे इत्यादी उपस्थित होते .