
सावंतवाडी : दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग मार्फत दिनांक ६ जानेवारी २०२३ रोजी प्राथमिक आश्रम शाळा, बोर्डवे येथे मोफत लाठी-काठी प्राथमिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालू असलेल्या प्राचीन मर्दानी युद्धकलेविषयी आवड निर्माण करणे, विरवृत्ती निर्माण करणे, प्रतिकारशक्ती वाढविणे, चापल्य व कौशल्य वाढविणे, स्वसंरक्षणासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनविणे आदी उद्दिष्टे नजरेसमोर ठेवून दुर्ग मावळा प्रतिष्ठान, कोकण विभागाने इच्छुक शाळा, हायस्कूल, महाविद्यालयांमध्ये हे प्रशिक्षण आयोजित करण्याचे ध्येय ठरविण्यात आले आहे.
या शिबिरातून मार्गदर्शक किशोर सरनोबत यांनी प्राथमिक आश्रमशाळा, बोर्डवे येथील निवडक विद्यार्थ्यांना लाठी-काठीचे प्रशिक्षण दिले.
शिबिराच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या हस्ते मार्गदर्शक किशोर सरनोबत यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक श्री. कर्पे सर, पालव सर, नाईक सर, श्रीमती. वैशाली गोसावी, अधीक्षिका उषा गोसावी आदि उपस्थित होते. दुर्ग मावळा परिवारातर्फे आश्रमशाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आभार मानण्यात आले.
हे शिबीर आपल्या परिसरातील शाळा, हायस्कूल व कॉलेजमध्ये आयोजित करण्यासाठी ९८६०२५२८२५, ९४२२२६३८०२ या भ्रमणध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन दुर्ग मावळा परिवारातर्फे करण्यात आले आहे.