जालन्यात लाठीजार्च ; वैभववाडीत मराठा समाजाचा निषेध

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: September 05, 2023 21:35 PM
views 132  views

वैभववाडी : जालन्यात आरक्षणासाठी सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनात केलेल्या लाठीचार्ज घटनेचा वैभववाडीत ठाकरे शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात आला.या घटनेच्या  निषेधार्थ आज  शिवसेनेच्यावतीने  निषेध मोर्चा काढण्यात आला.राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.त्यानंतर तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.

   जालना येथील घटनेचे पडसाद सर्व राज्यभर उमटत आहेत.काल तालुक्यात सकल मराठा समाजाच्यावतीने घटनेचा निषेध करण्यात आला होता.त्यानंतर आज तालुका शिवसेनेच्यावतीने शिवसेना कार्यालय ते तहसिल कार्यालय असा निषेध मोर्चा काढला.या मोर्चात ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे,तालुकाप्रमुख मंगेश लोके,स्वप्निल धुरी,दिगबंर पाटील,शिवाजी राणे,मनोज सावंत,गणेश पवार,सिध्देश रावराणे,भीमराव भोसले,मयुर दळवी,जयेश पवार,राजेश तावडे आदी सहभागी झाले होते.

शिवसेना कार्यालयापासुन मोर्चाला सुरूवात झाली.यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यानी शिंदे सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय,मराठ्यावर अत्याचार करणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन झालेच पाहीजे,मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहीजे अशा घोषणा देण्यात आल्या.त्यानंतर तहसिलदार दिप्ती देसाई यांना पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले.