
देवगड : भाजपचे नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची जयंती देवगड तालुक्यातील रापम सेवेबरोबर अन्य शासकीय निमशासकीय सेवेत असलेले वंजारी समाज बांधवांच्या वतीने जामसंडे येथील श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.या जयंती उत्सवाकरीता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळ ,पोलीस प्रशासन महसूल प्रशासन, शिक्षण विभाग, पंचायत समिती व अन्य विभागात सेवा बजावत असलेले सर्व वंजारी समाज बांधव त्याचबरोबर मुंढे प्रेमी नागरिक महिला बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
लोकनेते स्वर्गीय गोपीनाथजी मुंढे हे एक हे उत्तुंग व्यक्तिमत्व. निव्वळ वंजारी समाजाची संपत्ती नव्हती तर सर्व समाजातील गोर गरिबांची संपत्ती होते. त्यांचे आपल्या मातृभूमी प्रती असलेले कार्य निश्चितपणे समाजात क्रांती घडविणारे व कर्तृत्व व नेतृत्व निर्माण करणारे होते. समाजातील उपेक्षित घटकाला जे जे काही करता येईल ते सर्व समाजासाठी करीत असताना एक लोकनेता ,लोकनायक, संघर्ष योद्धा म्हणून त्यांचा जीवन प्रवास हा निश्चितपणे आजच्या पिढीला प्रेरणा देणारा आहे. त्यामुळे त्यांची विचारधारा घेऊन या पुढील काळात वंजारी समाजाबरोबरच अन्य समाज देखील आपली प्रगती करेल असे प्रतिपादन जामसंडे येथे आयोजित केलेल्या लोकनेते स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांच्या जयंती सोहळ्यात विविध मान्यवरानी बोलताना केले .
या जयंती सोहळ्याच्या प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत स्वर्गीय लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार करून उपस्थितानी त्यांना विनम्र अभिवादन केले.या निमित्ताने समाज बांधव कांतीलाल जाधवर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.लोकनेते स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांच्या जयंती सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सिंधुदुर्ग जिल्हा वंजारी सेवासंघ अध्यक्ष.अच्युत वणवे, जिल्हा उप अध्यक्ष संभाजीराव खाडे, जिल्हा सरचिटणीस लहू दहिफळे यांच्या समवेत राज्य परिवहन महामंडळ देवगड आगाराचे आगार व्यवस्थापक विजयकुमार घोलप, स्थानक प्रमुख श्रीकांत सैतवडेकर वाहतूक नियंत्रक तुकाराम देवरुखकर, अमित रावले ज्येष्ठ पत्रकार दयानंद मांगले, ज्ञानोबा फड उपस्थित होते. या जयंती उत्सवाच्या निमित्ताने गोपीनाथजी मुंडे यांच्या जीवन प्रवास त्यांचे राजकीय सामाजिक कार्य या विषयी अनिल घुगे, संदीप हंगे यांनी मार्गदर्शन करून भगवान बाबांविषयी विशेष मार्गदर्शन शिवाजीराव ढाकणे यांनी केले.व्यासपीठावर उपस्थित मान्यवर ज्ञानोबा फड यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यावर आधारित गीत सादर केले व त्यांना आदरांजली वाहिली.
उपस्थित मान्यवर आगार व्यवस्थापक विजय घोलप ,अमित रावले ,तुकाराम देवरुखकर ,दयानंद मांगले यांनी लोकनेते स्व.मुंडे साहेबांच्या विषयी आपले विचार मांडले. या जयंती उत्सवासाठी विशेष मेहनत घेतलेले देवगड आगार चालक कम वाहक पपू जाय भाय यांचा विशेष गौरव करण्यात आला.देवगड आगारात सेवेत असलेले चालक वाहक यांनीही विशेष मेहनत घेऊन हा सोहळा पार पाडला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश दहिफळे यांनी केले तर आभार प्रदर्शन ढाकणे मॅडम यांनी केले