
कुडाळ : राष्ट्रीय काँग्रेस घावनळे, घावनळे विकास मंडळ, घावनळे कै. आबा मुंज, कै. गुरु मुंज वेलफेअर फाऊंडेशन ग्रुप घावनळे यांच्या वतीने घावनळे गावचे भाग्यविधाते व कार्यसम्राट कै. आबा मुंज यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त ७ मार्च ते ११ मार्च या कालावधीत घावनळे गावठणवाडी येथे भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.रविवारी याठिकाणी माजी आमदार वैभव नाईक यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शविली.याप्रसंगी आयोजित डबलबारी सामन्याचा शुभारंभ वैभव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी आयोजकांच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मा. आम. वैभव नाईक म्हणाले, कै. आबा मुंज हे परोपकारी स्वभावाचे होते. अनेक गरजू नागरिकांना मदत करण्याचे काम त्यांनी केले. विविध सामाजिक कार्यातून त्यांनी घावनळे गावचे भाग्यविधाते व कार्यसम्राट म्हणून ओळख निर्माण केली होती.आपण सर्वजणांनी त्यांच्या कार्याचा वसा पुढे सुरु ठेवला आहे. हिच खरी त्यांना श्रद्धांजली आहे. असे प्रतिपादन वैभव नाईक यांनी केले. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, शिवसेना उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, काँग्रेसच्या साक्षी वंजारे, प्रथमेश परब, किरण टेंबुलकर, वेलफेअर फाऊंडेशन ग्रुपचे अध्यक्ष संतोष मुंज,पांडू खोचरे, बाबुराव शेळके, सुनील खोचरे, प्रमोद खोचरे, प्रभाकर खोचरे, दाजी धुरी, महेश पालव, सुनील पारकर, शुभम जाधव, सोनिया मुंज, शिवसेना शाखा प्रमुख दीपक सावंत, शिवसेनेचे पप्पू म्हाडेश्वर, संतोष नागवेकर, मधुकर घाडी, दादा मेस्त्री यांसह घावनळे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.