महाराष्ट्र शासनाच्या विविध पदांसाठी ऑनलाईन अर्ज भरून अनेक तरुणांनी घेतला लाभ

अर्ज भरण्यासाठी शेवटचे चार दिवस बाकी
Edited by: विनायक गांवस
Published on: February 10, 2023 18:05 PM
views 503  views

सावंतवाडी : महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागा अंतर्गत एकूण 8169 पदांसाठी महाराष्ट्र लोक सेवा आयोगा मार्फत पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे. त्याचा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील अनेक तरुणांनी लाभ घेतला आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ही 14 फेब्रुवारी 2023 पर्यंत आहे. 

सहाय्यक कक्ष अधिकारी,राज्य कर निरिक्षक, पोलीस उप निरिक्षक, दुय्यम निबंधक,दुय्यम निरिक्षक ,तांत्रिक सहाय्यक , कर सहाय्यक , लिपिक -टंकलेखक अशा अनेक पदांसाठी भरती करणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांची मोफत अर्ज भरून देण्याची व्यवस्था यशवंतराव चव्हाण सेंटर, सावंतवाडी याठिकाणी सकाळी 10.00 ते संध्याकाळी 5.30 पर्यंत सावंतवाडी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुरु आहे. पात्र उमेदवारांनी या साठी आवश्यक कागदपत्रे घेऊन येऊन तसेच फक्त परीक्षा शुल्क भरून आपला अर्ज दाखल करून नोंदणी करावी असे आवाहन राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग अध्यक्ष अर्चना घारे-परब यांनी केले आहे. शेवटचे चारच दिवस शिल्लक असल्याने लवकरात लवकर आपला अर्ज दाखल करून घ्यावा. नोंदणी केलेल्या उमेदवारांना मागणी केल्यास मोफत मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी या https://mpsc.gov.in किंवा https://mpsconline.gov.in वेबसाईटवर तसेच 9850063006 या क्रमांकावर संपर्क साधावा असेही या वेळी सौ. अर्चना घारे यांनी सांगितले.